* मरण *
मरणा मरणा थांब जरा,
मला थोडं चांगलं काही तरी करुदेत .
आतापर्यंत सर्व घेण्याचं काम केलं,
आता थोडं देण्याचं करुदेत .
गरिबांना लुबाडलं,
दुबळ्यांना छळलं त्यानां लुटलं.
पैसे , गाडी , बंगला
सर्व काही मिळवलं.
असे मिळवताना हे “मरणा”
तुझा विचारच आला नाही मनात .
पण समोर तू आल्यावर
आलो आहे आता भानात .
मग थोडं थांब ना
मला माझा स्वार्थीपणा सोडू देत .
अन सर्वांची निःस्वार्थीपणे
मनापासून सेवा करू देत .
|
अनाथांचा
पालक होऊ देत , आंधळ्यांची
काठी होऊ देत . गरिबांचा
अन्नदाता होऊ देत , वृद्धांना
मायेची सावली देऊ देत .
प्राणी
,पक्षी ,झाडे यांच्यावर नितांत
प्रेम करुदेत . हे
सर्व करून मला थोडं
समाधान मिळवू देत .
मग
तू मला ने , हे
मरणा थांबशील ना ? माझ्या
पापाचं प्रायश्चित्त मला करू देशील ना ?
|
*रुपाली काकडे*