* संघर्ष कर *
पाहिलेले स्वप्न तोडू नको
मनातील अपेक्षा सोडू नको
नकारात्मक विचार करू नको
कुणाशीही तुलना करू नको
बेजबाबदारपणे
वागू नको
स्वतःशी कधीही खोटे बोलू नको
जीवनाच्या वाटेवर हरू नको
प्रेमाने दिलेला हाथ सोडू नको
हरलास तरी रडत कधीही बसू नको
शिखर गाठताना दिशाहीन होऊ नको
जिद्द, चिकाटी, सातत्य सोडू नको
संघर्ष कर, झुंज देणे थांबवू नको
*रुपाली काकडे*