ONLY FOR YOU

Wednesday, October 3, 2012

* संघर्ष कर *

* संघर्ष कर *

पाहिलेले स्वप्न तोडू नको

मनातील अपेक्षा सोडू नको

नकारात्मक विचार करू नको

कुणाशीही तुलना करू नको

बेजबाबदारपणे वागू नको

स्वतःशी कधीही खोटे बोलू नको

जीवनाच्या वाटेवर हरू नको

प्रेमाने दिलेला हाथ सोडू नको

हरलास तरी रडत कधीही बसू नको

शिखर गाठताना दिशाहीन होऊ नको

जिद्द, चिकाटी, सातत्य सोडू नको

संघर्ष कर, झुंज देणे थांबवू नको

                              *रुपाली काकडे*

Saturday, March 17, 2012

गाळलेलं पान


Love

* प्रेम करशील का ? *

 

ज्या वाटेवर तू भेटलीस ती वाट

आपल्या मिलनाची नव्हती का ?

माझी जागा तर तुझ्या हृदयात होती

मग मी असा एकटाच का ?

 

मी माझ्याशीच प्रामाणिक आहे ,

तुझ्याशी बेईमानी करेन का ?

तुझ्या श्वासावर माझे जीवन आहे ,

तुझा जीव मी घेईन का ?

 

पूजा करतो मी तुझी ,

तुला कधी मी लाथाडेन का ?

वाहिले आहे माझे सर्वस्व तुला ,

वाऱ्यावर तुला मी सोडेन का ?


तुझ्या प्रेमाने जिंकलस मला ,

मग तुला कधी हरू देईन का ?

काळजी करणे म्हणजे जर प्रेम असेल ,

तर तुही माझी थोडी करशील का ?


माझ्यावर थोडे प्रेम करशील का ,

सांग ना करशील का ?

 

          * रुपाली काकडे *