ONLY FOR YOU

Thursday, June 12, 2014


पाऊस
 
वाट पाहुनी तुझी नयन तरसले
चातकाच्या मनी स्वप्न तुझेच दडलेले
चिंबचिंब भिजवून टाक आसमंत सारा
सर्वत्र दिसुदेत आशेच्या धारा

डोंगराच्या खाईतुन, द-याखो-यातुन
नाचत - बागडत ये रानावनातुन
हिरवळ दाटुदे गारवा पसरू दे
नदी नाले तुडुंब भरू दे
भिजु दे नखशिखांत धरती
नाचु दे मोर तुझ्याच तालावरती
येरे येरे पावसा
दे थोडा दिलासा
तुच तर देतोस सर्वांना आधार
बरसुनी ये आता नको घेऊ माघार

composed by r.m. thorawade

जीवन

पाण्याचा माठ म्हणजे जणु आपले जीवन
कच्चा माठ म्हणजे जणु आपले बालपण
आईप्रमाणे कुंभार आकार देतो मजबुत बनवतो भाजून ,शेकुण
अन बनतो समाजाचा नागरिक, जवान तरूण
आयुष्याची वर्षे जातात.संघर्ष करुन , झगडून
जणु त्या माठाची झीज होते वापरून, वापरून
मग लागतो तडा अण् माठ जातो फुटुन
वार्धक्य हि असेच जाते संपून
माठ असतों दुःखाने भरलेला
अश्रुंनी तुडुंब फुगलेला
दुःखाच्या या माठाला छोटस छिद्रअसतं
तर ते थोडतरी झिरपल असत
आणि मग थंड,गोड पाण्यासारख जीवन झालं असत
composed by r.m thorawade

 माझा गाव


माझा गाव,मायेची छाव,
निळेशार आकाश, लख्खप्रकाश,
हवेचा गारवा, पक्ष्यांचा थवा,
नागमोडी वाटा, मानुस कीने मोठा,
सारवलेली अंगणं, हिरवीगार रानं,
सळसळते झरे, झोपाळेगोजिरे ,
गोठयातंलीगाय, दुधावरलीसाय ,
तांदुळाची खिर, मायेची विहीर,
कोलारू घरं ,लाकडीदारं,
वडाचा पार, दोडणारीखार,
डोंगरसाजिरे, रंगीत,फुलपाखरे ,
गर्दवनराई,हिरवीगारअंबराई,
तांबडी माती ,संपन्न शेती,
वाहतीनदी ,माणसंसाधी
composed by r.m.thorawade