ONLY FOR YOU
Saturday, March 17, 2012
Love
*
प्रेम करशील का ? *
ज्या वाटेवर तू भेटलीस ती वाट
आपल्या
मिलनाची नव्हती का ?
माझी
जागा तर तुझ्या हृदयात होती
मग
मी असा एकटाच का ?
मी माझ्याशीच प्रामाणिक आहे ,
तुझ्याशी बेईमानी करेन का ?
तुझ्या श्वासावर माझे जीवन आहे ,
तुझा जीव मी घेईन का ?
पूजा करतो मी तुझी ,
तुला कधी मी लाथाडेन का ?
वाहिले आहे माझे सर्वस्व तुला ,
वाऱ्यावर तुला मी सोडेन का ?
तुझ्या प्रेमाने जिंकलस मला ,
मग तुला कधी हरू देईन का ?
काळजी करणे म्हणजे जर प्रेम असेल ,
तर तुही माझी थोडी करशील का ?
माझ्यावर थोडे प्रेम करशील का ,
सांग ना करशील का ?
* रुपाली काकडे
*
Subscribe to:
Posts (Atom)